देशात यावर्षी खरीप पीक पेरणीत लक्षणीय प्रगती झाली आहे, एकंदर पेरणी क्षेत्र 1 हजार 92 लाख हेक्टरच्या पुढं गेलं आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत अंदाजे 1 हजार 69 लाख हेक्टर पेरणी झाली होती. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागानं काल खरीप पिकांखालील क्षेत्राचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. भाताचे पेरणी झालेले क्षेत्र 409 लाख हेक्टरवर पोहोचले असून, मागील वर्षीच्या याच कालावधीत ते सुमारे 393 लाख हेक्टर होते. कडधान्य लागवड 117 लाख हेक्टरवरून 126 लाख हेक्टरपर्यंत वाढली आहे. भरड धान्याची पेरणी 189 लाख हेक्टरवर, तर तेलबियांची पेरणी 193 लाख हेक्टरवर झाली आहे. उसाचे पेरणी क्षेत्र 57 लाख हेक्टरवर पोहोचले आहे.
Site Admin | September 10, 2024 9:45 AM | Kharif crop