नवी दिल्लीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या निवासस्थानी रालोआच्या घटक पक्षांची बैठक झाली. घटक पक्षांमधील समन्वय दृढ करणं हे या बैठकीचं उद्दिष्ट होतं. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, नागरी उड्डाण मंत्री, अवजड उद्योगमंत्री एच. डी कुमारस्वामी, पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंग आणि आरोग्य राज्यमंत्री अनु्प्रिया पटेल उपस्थित होते.
Site Admin | December 25, 2024 7:43 PM | NDA LEADER MEETING