आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेकडून देणगी स्वीकारण्याची राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षानं केलेली मागणी केंद्रीय निवडणूक आयोगानं मान्य केली आहे. पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल निवडणूक आयोगाची भेट घेतली. त्यानंतर त्या बोलत होत्या.
Site Admin | July 9, 2024 3:41 PM | राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्ष | विधानसभा निवडणुक | सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाला जनतेकडून देणगी स्वीकारता येणार
