राजकीय नेत्यांमधे पूर्वी असलेला सुसंवाद आता उरला नसल्याची खंत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिर्डी इथं शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. देशाच्या गृहमंत्र्यांनी भाषण करताना थोडीफार माहिती घेऊन बोललं पाहिजे. १९७८ साली मी मुख्यमंत्री असताना त्यात जनसंघाचे नेते मंत्रिमंडळात होते. नंतरच्या काळातही वेगवेगळ्या राजकीय पक्षांमधल्या नेत्यांमधे सुसंवाद होता. ते अतिरेकी भूमिका घेऊन समाजकारण किंवा राजकारण केलं नाही, असं सांगत पवार यांनी अमित शहा यांच्यावर टीका केली.
Site Admin | January 14, 2025 8:52 PM | Sharad Pawar
राजकीय नेत्यांमधे पूर्वी असलेला सुसंवाद उरला नसल्याची खंत-शरद पवार
