राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विधानसभा गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मुंबईत पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. तसंच पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी रोहित पाटील, तर प्रतोदपदी उत्तम जानकर यांची निवड केल्याचंही त्यांनी जाहीर केलं. विधिमंडळ पक्षनेतेपदाचा निर्णय या बैठकीत झाला नसून येत्या काळात याबाबत पुन्हा बैठक घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांची संख्या कमी असली, तरी राज्याच्या जनतेचे प्रश्न धडाडीने आणि प्रभावीपणे विधिमंडळात मांडू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
Site Admin | December 1, 2024 7:05 PM | Gautam Adani | NCP Sharad Chandra Pawar Party
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विधानसभा गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड, तर मुख्य प्रतोदपदी रोहित पाटील यांची निवड
