आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेची बांधणी आणि पक्षाच्या महत्वाच्या धोरणांच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोअर ग्रुपची स्थापना केल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं.
उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल पटेल राष्ट्रीय, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे यांचा यात समावेश करण्यात आला आहे.