विधानसभा निवडणुकीत पक्षाविरोधात बंडखोरी करणाऱ्या आठ पदाधिकाऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे. या पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक पक्षाची आणि महायुती सरकारची प्रतिमा मलीन केल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी म्हटलं आहे. बापू भेगडे, कृष्णा अंधारे, विश्वंभर पवार, पूजा व्यवहारे, ज्ञानेश्वर भामरे, ममता शर्मा, धनेंद्र तुरकर आणि आनंद सिंधीकर या पदाधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
Site Admin | November 8, 2024 7:40 PM | NCP
राष्ट्रवादी काँग्रेसची बंडखोर पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
