राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने महिलांचा सहभाग असलेल्या सहकारी संस्थांच्या विकासासाठी ७ हजार ७०८ कोटी रुपयांहून अधिक अर्थसाहाय्य मंजूर केलं आहे. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी ही माहिती दिली. देशात २५ हजार ३८५ महिला कल्याणकारी सहकारी संस्था नोंदणीकृत आहेत. या संस्थांची सामाजिक- आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी महामंडळ महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. तसंच, सहकार क्षेत्रात महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने विविध उपक्रम हाती घेतल्याचंही शहा यांनी सांगितलं. देशात १ लाख ४४ हजारांहून अधिक दुग्धोत्पादक सहकारी संस्था असून ग्रामीण भागातल्या महिला मोठ्या संख्येने या क्षेत्रात कार्यरत आहेत, असंही शहा यावेळी म्हणाले.
Site Admin | December 4, 2024 7:55 PM | Minister Amit Shah