संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या अध्यक्षतेखाली एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेचे संयुक्त राज्य प्रतिनिधी आणि उपमहासंचालकांची बैठक उद्या नवी दिल्लीत होणार आहे. एनसीसी छात्रांची संख्या तीन लाखांनी वाढवून १७ लाखांपासून २० लाखांपर्यंत नेण्याच्या आराखड्याला नुकतीच मंजुरी मिळाली होती, त्यासह इतर विषयांवर या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय धोरणांमध्ये सुधारणा, आर्थिक गरजा, संबंधित घटकांमध्ये समन्वय वाढवणं, प्रशिक्षण आणि शिबिरांसाठी नव्या पायाभूत सुविधा उभारणं या विषयांवर यावेळी चर्चा होईल.
Site Admin | September 22, 2024 6:14 PM | NCC
एनसीसीचे संयुक्त राज्य प्रतिनिधी आणि उपमहासंचालकांची उद्या नवी दिल्लीत बैठक
