डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवादाचा बीमोड होईल, केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन

पुढच्या वर्षी मार्चअखेरीपर्यंत देशातून नक्षलवादाचा बीमोड होईल, आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाची त्यात महत्त्वाची भूमिका असेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. मध्यप्रदेशात नीमच इथं केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ८६व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनने नक्षलविरोधी मोहिमांमधे महत्वाची कामगिरी बजावली आहे असं ते म्हणाले. विविध मोहिमांमधे सीआरपीएफचे २ हजार २६४ जवान शहीद झाल्याचं सांगून त्यांनी शहीदांना आदरांजली वाहिली. विशेष कामगिरी बजावणाऱ्या जवानांना केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. अमित शाह यांनी शहीद स्थळावर पुष्पचक्र अर्पण केलं तसंच सीआरपीएफ दलाच्या संचलनाची मानवंदना स्वीकारली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि सीआरपीएफचे महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंग कार्यक्रमाला उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा