गडचिरोली जिल्ह्यात आज भामरागड दलमची सदस्य असलेल्या एका नक्षल महिलेनं पोलिस आणि केंद्रीय राखीव दलासमोर आत्मसमर्पण केलं. ८ चकमकी, ३ खून आणि एका दरोड्याच्या गुन्ह्यात तिचा सहभाग होता. राज्य शासनानं तिच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
गडचिरोली जिल्ह्यात आजपासून सुरु झालेल्या नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहात पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे दिवसभरात कोणतीही अनुचित घटना घडली नाही, अशी माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.