नौदल संरक्षण सामग्री अद्ययावत करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने 21 हजार कोटी रुपयांच्या उपकरण खरेदी प्रस्तावाला काल मंजुरी दिली. संरक्षण अधिग्रहण परिषदेनं 21 हजार 772 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पाच भांडवली अधिग्रहण प्रस्तावांचा यात समावेश आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील काल नवी दिल्ली इथं परिषदेची बैठक झाली, त्यावेळी ही मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे. यामध्ये पाण्यावरुन अतिजलद मारा करणाऱ्या 31 विमानांच्या खरेदीसाठी मंजूरी, कमी-तीव्रतेच्या सागरी मोहिमा, नौदलाच्या क्षेत्रात पाळत ठेवणे, गस्त आणि किनारपट्टीजवळ शोध आणि बचाव कार्यासाठी कामात मदत करणाऱ्या यंत्रणेचा समावेश आहे. याशिवाय, ही जहाजे चाचेगिरीविरोधी मोहिमांमध्ये, विशेषत: भारतीय बेटांच्या प्रदेशात आणि आसपास क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावतील.
Site Admin | December 4, 2024 11:11 AM | नौदल | राजनाथ सिंह