डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

देशाचं आणि समाजाचं नुकसान करत असलेल्या, न दिसणाऱ्या शत्रूशी लढण्यासाठी, समाजानं एकत्र येणं आवश्यक आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालयानं वाशी इथं आयोजित केलेल्या “नशामुक्त नवी मुंबई” अभियानाचं उद्घाटन करताना बोलत होते. अंमली पदार्थांच्या माध्यमातून काही लोक समाज पोखरण्याचं दुष्कर्म करत आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी सजग राहा, सैनिक म्हणून पुढं या, हीदेखील एक प्रकारची देशभक्ती आणि समाजाची सेवा आहे, असं फडनवीस म्हणाले. 

 

यावेळी वनमंत्री गणेश नाईक, प्रख्यात अभिनेता आणि “नशामुक्त नवी मुंबई” या उपक्रमाचे आयकॉन जॉन अब्राहम, स्थानिक लोक प्रतिनिधी, नशामुक्तीचं काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी, आदी उपस्थित होते.

 

मुंबईत भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात असलेल्या डॉ.भाऊ दाजी लाड संग्रहालयाचं नूतनीकरण मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे. या नूतनीकरण केलेल्या संग्रहालयाचं लोकार्पणही आज मुख्यमंत्र्यांनी केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा