डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 13, 2024 2:54 PM | Navi Mumbai

printer

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी.वावा यांची नवी मुंबई पालिकेला भेट

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी.वावा यांनी आज नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांना एका सादरीकरणाद्वारे महानगरपालिकेच्या स्वच्छताविषयक कार्याची आणि सफाई कर्मचाऱ्यांसाठीच्या सोयीसुविधांची माहिती पालिका आयुक्तांनी दिली. डॉ.वावा यांनी महानगरपालिकेच्या स्वच्छताविषयक विविध वाहनांची आणि यंत्रसामुग्रीची प्रत्यक्ष पाहणी केली तसंच सफाईमित्रांशी संवाद साधला. इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबई महानगरपालिकेचं  काम पुढारलेलं असून स्वच्छता कामगारांच्या सुरक्षेची आणि आरोग्याची विशेष काळजी घेतली जात असल्याबद्दल डॉ.वावा यांनी समाधान व्यक्त केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा