संरक्षण, अवकाश तंत्रज्ञान, ऑटोमोटिव्ह उत्पादनं आणि वैद्यकीय उपकरणांच्या विकास आणि उत्पादन मानकांसाठीच्या केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेचं भूमिपूजन आज नवी मुंबईत झालं. समीर अर्थात सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या आवारात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांनी ही पायाभरणी केली. या प्रयोगशाळेसाठी 37 कोटी 21 लाख रुपये खर्च येणार आहे. ही प्रयोगशाळा हे सरकारच्या आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाकडे एक पाऊल असल्याचं कृष्णन म्हणाले. केंद्र सरकार देशात स्वदेशी परिसंस्थेला प्रोत्साहन देत आहे. ही उपकरणं लष्करी आणि नागरी मानकांसाठी पात्र असणं अनिवार्य आहे. ही प्रयोगशाळा त्यासाठी काम करेल.
Site Admin | January 20, 2025 7:21 PM | Navi Mumbai
आत्मनिर्भर भारत अंतर्गत स्वदेशी प्रणालीच्या चाचणीसाठी नवी मुंबईत प्रयोगशाळेचं भूमिपूजन
