संरक्षण क्षेत्रात स्वावलंबनाला चालना देऊन संरक्षण सामुग्रीची आयात कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा पुनरुच्चार सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला. भारतीय नौदलाच्या नवोन्मेष आणि स्वदेशीकरण परिसंवाद, स्वावलंबन २०२४ या कार्यक्रमात ते आज बोलत होते. संरक्षण क्षेत्रात खासगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रांचं समसमान योगदान असायला हवं असं संरक्षणमंत्र्यांनी अधोरेखित केलं. सशक्त संरक्षण औद्योगिक परिसंस्था उभारण्यासाठी सरकारने खासगी क्षेत्राला अनेक सवलती दिल्या आहेत, असंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं.
Site Admin | October 29, 2024 8:07 PM | Defence Minister Rajnath Singh | Swavlamban 2024