नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने पाच लाख ३० हजार ४५ शेतकऱ्यांना ५३५ कोटी ६५ लाख ७४ हजार रुपयांची मदत वितरित केली आहे. मदतीची ही रक्कम थेट आपदग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात लातूर जिल्ह्यातल्या एक लाख ६८ हजार ८९ शेतकऱ्यांना १७८ कोटी ६५ लाख रुपये, परभणी जिल्ह्यातल्या एक लाख १२ हजार ६४८ शेतकऱ्यांना १२१ कोटी ६४ लाख, बीड जिल्ह्यातल्या ३९ हजार ९३ शेतकऱ्यांना ३० कोटी २२ लाख, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या तीन हजार ६१९ शेतकऱ्यांना ३ कोटी २३ लाख, हिंगोली जिल्ह्यातल्या दोन हजार ४०८ शेतकऱ्यांना एक कोटी ६३ लाख, नांदेड जिल्ह्यातल्या एक हजार ८८६ शेतकऱ्यांना १ कोटी ५८ लाख, जालना जिल्ह्यातल्या एक हजार ५९० शेतकऱ्यांना १ कोटी ५७ लाख, तर धाराशिव जिल्ह्यातल्या ३४२ शेतकऱ्यांना ३२ लाख ५० हजार रुपये वितरीत करण्यात आले आहेत.
Site Admin | January 10, 2025 9:07 AM | farmers | Natural Disaster