गेल्यावर्षी पूर, भूस्खलन, वादळे यांसारख्या नैसर्गिक संकटांना सामोरं जावं लागलेल्या पाच राज्यांना एक हजार ५५४ कोटी रुपयांहून अधिक मदत केंद्र सरकारनं मंजूर केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्च स्तरीय समितीनं ही मंजूर दिली असून हा निधी राष्ट्रीय आपत्ती निवारण कोष- NDRF च्या माध्यमातून दिला जाणार आहे.
आंध्र प्रदेशला ६०८ कोटी रुपये, नागालँडला १७० कोटी रुपये ओदिशासाठी २५५ कोटी रुपये, तेलंगणासाठी २३१ कोटी रुपये, तर त्रिपुरा राज्यासाठी २८८ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचं गृहमंत्रालयानं सांगितलं. ही अतिरीक्त मदत केंद्रानं याआधी त्या राज्यांना दिलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या व्यतिरीक्त असल्याचंही गृहमंत्रालयानं सांगितलं.