डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 7, 2024 8:26 PM | TB | TBMuktBharat

printer

देशव्यापी क्षयरोग निर्मूलन अभियानाचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

देशव्यापी क्षयरोग निर्मूलन अभियानाला आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते हरयाणात पंचकुला इथं प्रारंभ झाला. देशातली ३३ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांतल्या मिळून ३४७ जिल्ह्यांत आजपासून १०० दिवस ही मोहिम राबवली जाणार आहे. यात क्षयरोगाविषयी जनजागृती करणं आणि क्षयरोगाबद्दलच्या गैरसमजुती दूर करणं यांचा समावेश आहे. २०२५ पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्यासाठी कोणतीही कसर सोडली जाणार नाही असं नड्डा त्यांनी सांगितलं. क्षयरोगरुग्णांना आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळत असल्याचंही ते यावेळी म्हणाले. या मोहिमेत क्षयरोगाचे नवीन रुग्ण शोधणं, गंभीर आजारी असलेल्या रुग्णांसाठी आधुनिक उपचार तसंच पोषक आहार देण्यावर भर देण्यात येणार आहे.

 

क्षयरोगाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करून १०० दिवसांची विशेष मोहीम सुरू केल्यानं क्षयरोगाविरोधात देशाचा लढा अधिक बळकट झाला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. क्षयरोग निर्मूलनासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं.

 

क्षयरोगनिर्मूलन मोहिमेला जिल्हा पातळीवरही आज प्रारंभ झाला. नांदेड जिल्ह्यात तुप्पा प्राथमिक आरोग्य केंद्र इथं जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या हस्ते क्षयरोग निर्मूलन मोहिमेला सुरुवात झाली. नंदुरबार जिल्ह्यात जनजागृतीसाठी नि-क्षय वाहनाला हिरवा झेंडा दाखवून रॅली काढण्यात आली. यावेळी सर्वांनी जागरूक राहून क्षयरोग मुक्त भारतासाठी योगदान देण्याची शपथ घेतली. या अंतर्गत अनाथाश्रम, वृद्धाश्रम, उद्योग संस्था, निवासी शाळा आणि कारागृहासह अनेक ठिकाणी क्षयरोग तपासणी करण्यात येणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा