डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राष्ट्रीय हळद बोर्डाच्या स्थापनेचं प्रधानमंत्र्यांकडून स्वागत

देशातल्या हळद उत्पादकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तसंच हळद उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी केंद्रसरकारने राष्ट्रीय हळद बोर्डाची स्थापना केली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्ली इथं या हळदबोर्डाचं उद्घाटन केलं. तेलंगणात निजामाबाद इथं या बोर्डाचं मुख्यालय असून श्री पल्ले गंगा रेड्डी त्याचे पहिले अध्यक्ष असतील असं गोयल यांनी सांगितलं. या बोर्डावर केंद्रसरकारच्या विविध खात्यांचे तसंच विविध हळद उत्पादक राज्यांचेही प्रतिनिधी नेमले जातील असं ते म्हणाले.

 

महाराष्ट्र, तेलंगण, आंध्रप्रदेश सह एकूण २० राज्यातल्या हळद उत्पादकांच्या  उत्पन्नवाढीसाठी या मंडळामार्फत उपाययोजना करण्यात येतील. तसंच हळद उत्पादनाची नवीन तंत्र आणि पद्धतींविषयी तसंच हळदीच्या औषधी गुणांविषयी जनजागृती करण्यात येईल. २०२३-२४ यावर्षात देशात तीन लाख ५ हजार हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड झाली आणि १० लाख ७४ हजार टन उत्पादन मिळालं. हे एकूण जागतिक उत्पादनाच्या ७० टक्के असल्याचं गोयल यांनी सांगितलं. या काळात हळद आणि हळदीपासून तयार केलेल्या सुमारे १ लाख ६२ हजार टन उत्पादनांची निर्यात झाली, त्यांचं एकत्रित मूल्य सुमारे २२ कोटी ६५ लाख अमेरिकन डॉलर्सएवढं होतं.

 

राष्ट्रीय हळद बोर्डाच्या स्थापनेचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यामी स्वागत केलं आहे. समाजमाध्यमावर त्यांनी म्हटलंय की देशातल्या कष्टाळू हळद उत्पादकांच्या कल्याणासाठी बोर्डाची स्थापना ही  आनंदाची घटना आहे. शेतकरी आणि ग्राहक दोन्ही घटकांना फायदा होईल अशा प्रकारे निर्यात प्रोत्साहन, नवोन्मेष आणि संशोधन या बोर्डाच्या माध्यमातून होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा