डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 28, 2024 1:42 PM | Maharashtra

printer

राज्यातल्या दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

केंद्र सरकारच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यंदा देशभरातील ५० शिक्षकांना या पुरस्कारांनं सन्मानित करण्यात येणार आहे; यात महाराष्ट्रातल्या दोन शिक्षकांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील आदिवासीबहुल जाजावंडी इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक मंतय्या बेडके; तसंच कोल्हापुरातील स. म. लोहिया माध्यमिक शाळेतील कलाशिक्षक सागर बगाडे यांना यंदाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या पाच सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा