२०२४ या वर्षात जगभरातला सर्वाधिक भांडवली निधी NSE अर्थात राष्ट्रीय शेअर बाजारातून उभारला गेला. आशियातल्या सर्वाधिक IPO- प्राथमिक समभाग विक्रींची नोंदही या शेअर बाजारात झाल्याचं NSE नं पत्रकात म्हटलं आहे.
गेल्यावर्षी भारतीय बाजारातून कंपन्यांनी साडे १९ अब्ज डॉलरचा निधी गोळा केला. अमेरिकेच्या नॅसडॅकमधून साडे १६ अब्ज डॉलर आणि न्यूयॉर्क शेअर बाजारातून सुमारे १६ अब्ज डॉलरचा निधी या कालावधीत कंपन्यांनी गोळा केला. २०२४ या वर्षात राष्ट्रीय शेअर बाजारात एकूम २६८ IPO ची नोंद झाली. त्यात ९० मोठ्या कंपन्यांचे आणि १७८ लघू आणि मध्यम कंपन्यांचे होते. चीनच्या शांघाय शेअर बाजारात गेल्यावर्षी १०१ तर जपानच्या शेअर बाजारात ९३ IPO आले होते.