मुंबईत राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेचं उद्घाटन आज केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते झालं. राज्याचे कौशल्य आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संस्थेने काही सामंजस्य करारही केले.
राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था गेल्या सहा दशकांपासून कौशल्यविकासावर काम करत आहे. राज्य सरकारही कौशल्य विकासात महत्वाची भूमिका बजावत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या इंटर्नशीप योजनेत ज्या ५०० कंपन्या आहेत त्यात कौशल्य प्राप्त केलेल्या तरुणांना संधी मिळेल आणि कंपन्यांनाही कुशल कर्मचारी मिळतील. केंद्रसरकार आणत असलेल्या महत्वाकांशी योजना राज्य शासनाचीसुद्धा भागीदारीही असेल”, असं जयंत चौधरी यांनी यावेळी सांगितलं.