डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारतीय सेनेच्या वरूण तोमरला १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात अजिंक्यपद

नवी दिल्ली इथंल्या डॉ. करणी सिंह शूटिंग रेंजमध्ये पार पडलेल्या  ६७ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत आज भारतीय सेनेच्या वरूण तोमरनं आज १० मीटर एअर पिस्तूल प्रकारातलं राष्टीय नेमबाजी स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं असून  वरूणचा संघ सहकारी प्रद्युम्न सिंह ह्यानं रौप्य तर राजस्थानच्या आकाश भारद्वाजनं  कांस्य पदक पटकावलं आहे. 

 

वरूण  तोमरनं पुरुषांच्या जुनिअर  गटाच्या  १० मीटर एअर पिस्तूल प्रकारातलं अजिंक्यपदही पटकावलं असून उत्तर प्रदेशच्या निखिलनं या स्पर्धेचं रौप्य तर प्रद्युम्न सिंह ह्यानं कांस्य पदक पटकावलं आहे.

 

त्या व्यतिरिक्त युवा गटाच्या  १० मीटर एअर पिस्तूल प्रकारातलं सुवर्णपदक  उत्तर प्रदेशच्या चिराग शर्मानं, रौप्य पदक त्याचा संघ सहकारी देव प्रताप ह्यानं तर कांस्य पदक राजस्थानच्या मयांक चोधरीनं पटकावलं आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा