शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘राष्ट्रीय साधन-सह-योग्यता शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत वर्ष 2024-25 साठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) वर नव्याने अर्ज सादर करण्याची आणि अर्ज नूतनीकरण करण्याची अंतिम तारीख येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या गुणवंत विद्यार्थ्यांची इयत्ता आठवी, नंतर होणारी गळती रोखण्यासाठी आणि त्यांचे शालेय शिक्षण बारावीपर्यंत पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती दिली जाते.
Site Admin | November 2, 2024 8:22 PM | NSP
NSP वर नव्याने अर्ज सादर करण्याची आणि अर्ज नूतनीकरणासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत वाढ
