राष्ट्रीय प्रसारण सेवा अर्थात प्रसार भारतीनं आपलं ओटीटी व्यासपीठ वेव तयार केलं आहे. इफ्फीच्या उद्घाटन कार्यक्रमात त्याचं अनावरण झालं. जुन्या काळातला करमणूक ठेवा नव्या तंत्रज्ञानात लोकांसमोर आणण्यासाठी या व्यासपीठाची निर्मिती करण्यात आली आहे. वेव या व्यासपीठाच्या माध्यमातून रामायण, महाभारत, शक्तीमान आणि हमलोग सारख्या मालिका पुन्हा पाहता येणार आहे. इतर ओटीटी व्यासपीठांपेक्षा वेव वैशिष्ट्यपूर्ण असेल, असं प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सैगल म्हणाले. वेव द्वारे १२ भाषांतले १० प्रकारचे कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहेत. अयोध्येतल्या राम मंदिरातल्या आरतीचे थेट प्रसारण, त्याचप्रमाणे मन की बातही प्रसारित केली जाईल.
Site Admin | November 21, 2024 2:55 PM | OTT platform | Prasar Bharati | WAVES