डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मणिपूरमध्ये, बिरेन सिंग सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेण्याचा नॅशनल पिपल्स पार्टीचा निर्णय

मणिपूरमध्ये, नॅशनल पिपल्स पार्टीनं एन बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. नॅशनल पिपल्स पार्टीचे अध्यक्ष कॉनराड संगमा यांनी भाजपा अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांना पत्राद्वारे हा निर्णय कळवला आहे. राज्यातली सध्याची कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक असून गेल्या काही दिवसात ती आणखीच चिघळत चालली आहे. त्यात अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे, असं संगमा यांच्या पत्रात म्हटलं आहे. हा प्रश्न सोडवण्यात आणि राज्यातली स्थिती पूर्ववत करण्यात बिरेनसिंग यांच्या नेतृत्वाखालचं सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे, त्यामुळे आपल्या पक्षानं या सरकारला दिलेला पाठिंबा तात्काळ काढून घ्यायचा निर्णय घेतलाय, असंही या पत्रात म्हटलं आहे. मणिपूर विधानसभेत नॅशनल पिपल्स पार्टीचे सात आमदार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा