श्रीलंकेत नॅशनल पीपल्स पॉवर या पक्षानं संसदीय निवडणुकांमध्ये पुन्हा बहुमताचा आकडा पार केला आहे. अजून मतमोजणी सुरू असली तरी आतापर्यंत संसदेच्या निवडणुकीतल्या १७१ पैकी १४१ जागा या डाव्या आघाडीला मिळाल्या आहेत. त्यामुळं राष्ट्रपती दिसा नायके यांना संसदेचं मजूबत पाठबळ मिळेल. २२५ सदस्यीय संसदेतल्या २९ नामनिर्देशित सदस्यांमध्येही याच पक्षाच्या सदस्यांना अधिकाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समागी जन बलवेगाया या सजित प्रेमदासा यांच्या पक्षाला आतापर्यंत ३५ जागा मिळाल्या आहेत. माजी अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांच्या न्यू डेमॉक्रेटिक फ्रंटला केवळ ३ जागा मिळाल्या आहेत.
श्रीलंकेत काल झालेल्या मतदानात ६५ टक्के मतदारांनी मतदान केलं होतं.
Site Admin | November 15, 2024 2:43 PM | SriLankaElections