डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पुण्यात येत्या 12 तारखेपासून राष्ट्रीय पॅरा नेमबाजी स्पर्धांचं आयोजन

तीक्ष्ण नजर आणि एकाग्रता ही नेमबाजी या खेळाची बलस्थानं… पण नजरच नसेल तर ? पण तरीही हा खेळ खेळता येऊ शकतो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकही मिळवता येऊ शकतं हे दिव्यांग नेमबाजांनी सिद्ध करून दाखवलं आहे. अशीच चमकदार कामगिरी करणाऱ्या दिव्यांगाच्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा पुण्यात रंगणार आहेत.

पुण्यातल्या म्हाळुंगे बालेवाडी इथल्या श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात 12 ते 16 नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय पॅरा नेमबाजी स्पर्धा होत आहेत. टोकियो आणि पॅरिस पॅरालिंपिक सुवर्ण पदक विजेत्या खेलरत्न पुरस्कार विजेत्या अवनी लेकरा, पॅरिस पॅरालिंपिक रौप्य पदक विजेते मनिषा नरवाल, कांस्यपदक विजेत्या रुबिना फ्रांसिस, टोकियो पॅरालिंपिक रौप्य, कांस्यपदक विजेते, अर्जून पुरस्कार विजेते सिंहराज अंधाना यांचा खेळ पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेत दिव्यांग खेळाडूंना विशेष सुविधा देण्यात आल्या. ज्यांना दृष्टी नाही अशा खेळाडूंसाठी बंदूक आणि लक्ष्य यांच्यावर सेन्सर बसवण्यात आले. या सेंसर कडून येणाऱ्या संकेताच्या सहाय्याने या नेमबाजपटूंना नेम साधण्यासाठी मदत होणार आहे. ज्यांना हात नाही अशा अपंग नेमबाजपटूंसाठी स्प्रिंग आणि टेबलची योजना करण्यात आली असून खांद्याच्या सहकार्याने ट्रिगर करून नेम साधता येणार आहे. यासह अनेक तांत्रिक बाबा मध्ये खेळाडूंच्या सोयीसाठी फेरफार करण्यात आले. ही स्पर्धा दहा मीटर 25 मीटर आणि 50 मीटर रायफल आणि एअर पिस्टल प्रकारात होणार आहे. स्पर्धेत दहा पॅरा ऑलिंपियन खेळाडू 40 अंतरराष्ट्रीय खेळाडू तसेच देशभरातून 500 राष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार आहेत. महाराष्ट्राकडून 55 खेळाडू सहभागी होणार असून स्वरूप उन्हाळकर, संतोष गाढे, सागर कातळे, नरेंद्र गुप्ता यांच्या कडून पदकांची अपेक्षा आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा