राष्ट्रीय पंचायतराज दिनानिमित्त यवतमाळ इथं आज काँग्रेसने सत्याग्रह आंदोलन केलं. नागरिकांना आर्थिक सामाजिक न्याय देणारी लोकशाही व्यवस्था जगायला हवी. मात्र, शासनाने गेले ३ ते ५ वर्षं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतलेल्या नाहीत. त्यामुळे निर्णयप्रक्रियेत सामान्य माणसांचा सहभाग नगण्य होत चाललेला आहे, अशी भूमिका या आंदोलनामागे असल्याचं माजी मंत्री वसंत पुरके यांनी यावेळी सांगितलं.
Site Admin | April 24, 2025 3:35 PM | Congress | National PanchayatiRaj Day
यवतमाळमध्ये काँग्रेसचं सत्याग्रह आंदोलन
