एनएफडीसी अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाअतंर्गत येणाऱ्या मुंबईतल्या पेडर रोड इथं असलेल्या राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाचा सहावा वर्धापन दिन येत्या रविवारी, १९ जानेवारीला साजरा केला जात आहे. वर्धापनदिनानिमित्त संग्रहालय आतून पाहण्याची संधी १३ वर्षे आणि त्याखालील मुलांना निःशुल्क मिळणार आहे.
मुलांमधील सृजनशीलता आणि चित्रपटाबद्दलचं कुतुहल वाढवण्याच्या उद्देशानं दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. लहान मुलाच्या भावविश्व रेखाटणारा पप्पू की पगडंडी या चित्रपटचा खास शो रविवारी संध्याकाळी साडेचारला मुलांना दाखवला जाणार आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी nmicmumbai@nfdcindia.com या ई मेलवर संपर्क साधावा.