देशातल्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी आणि रुग्णसेवा संस्थांनी आपल्या परिसरात विद्यार्थी, निवासी डॉक्टर्स, अध्यापक यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करुन देण्यासाठी धोरण आखावं अशी सूचना राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं केली आहे. बाह्यरुग्ण विभाग, वॉर्डस्, वसतिगृहं इत्यादी ठिकाणी सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना असाव्यात तसंच संध्याकाळनंतर सगळीकडे पुरेसा उजेड असावा आणि कमी वर्दळीच्या ठिकाणीही सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशाही सूचना आयोगानं केल्या आहेत.
Site Admin | August 14, 2024 10:53 AM | National Medical Commission