देशभरात आज राष्ट्रीय विधी सेवा दिन साजरा केला जात आहे. नागरीकांमध्ये कायदेविषयक जनजागृती व्हावी आणि समाजातल्या वंचित घटकांसह सर्व नागरिकांना न्याय प्रक्रियेचा लाभ मिळावा, हा यामागचा उद्देश आहे. नागरिकांना त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत शिक्षण देण्यासाठी तसंच विविध प्रकल्प आणि योजनांच्या माध्यमातून विवाद निवारण यंत्रणा मजबूत करुन अधिक न्याय्य समाजाची निर्मिती करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.