सूर्यावर लक्ष ठेवण्यासाठी भारत लद्दाखमध्ये नॅशनल लार्ज सोलर टेलिस्कोप – एनएलएसटी उभारण्याची तयारी करत आहे. या प्रकल्पाचं नेतृत्व बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स – आयआयए चे संचालक प्राध्यापक अन्नपूर्णी सुब्रमण्यमकरत आहेत. या प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्यात आली असून हा प्रकल्प अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. आयआयए नुसार, या दुर्बिणीमध्ये 2 मीटरचे रिफ्लेक्टर बसवलेले असतील. यामुळे शास्त्रज्ञांना सूर्यावर होत असलेल्या हालचाली समजून घेण्यास आणि संशोधन करण्यास मदत होईल.
Site Admin | November 3, 2024 11:44 AM | National Large Solar Telescope