राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. देशाची प्रगती आणि विकासामध्ये शेतकऱ्यांच महत्व आणि भागिदारी अधोरेखित करणं, अन्न सुरक्षा, शाश्वत ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी परंपरा जपण्यासाठी शेतकऱ्यांचं योगदान कसं महत्वाचं आहे यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. शेतकऱ्यांची महत्त्वाची भूमिका ओळखून सरकारने त्यांच्या सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी आणि शाश्वत कृषी विकासासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. देशात यंदा विक्रमी ३३२ दशलक्ष टनापेक्षा जास्त अन्नधान्याचं उत्पादन झाले आहे. ३२९ दशलक्ष टन इतकं होतं. माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचा जयंतीदिन शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो.
Site Admin | December 23, 2024 1:31 PM | National Farmers Day