भारतीय तंत्रशिक्षण संस्था अर्थात आयआयटी मुंबई मध्ये काल राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त निवडक प्राध्यापकांना संशोधन प्रकाशन पुरस्कार आणि प्रभावशाली संशोधन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. प्रत्येक संशोधन पुरस्कारामध्ये सन्मानपत्र, 5000 रुपये रोख पुरस्कार आणि पाच लाख रुपयांचे अंतर्गत संशोधन अनुदान यांचा समावेश आहे. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त देशात दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो. यावेळी बोलताना प्रमुख पाहुण्या, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू प्रा. वसुधा कामत यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आशय आणि त्यातून शिक्षण व्यवस्थेत कसा बदल घडू शकतो याविषयी माहिती दिली.
Site Admin | November 12, 2024 10:14 AM | IIT Mumbai | National education day