उमंग ऍप आणि डिजिलॉकर सुविधा यांच्या एकत्रीकरणाची घोषणा राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभागानं केली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना एकाच प्रणालीमधून विविध सरकारी सेवा सहजपणे मिळू शकणार आहेत. उमंग ऍप सर्व अँड्रॉइड मोबाईल दूरध्वनीधारकांसाठी उपलब्ध आहे आणि त्याच्या सेवांचा वापर डिजिलॉकर ऍपच्या माध्यमातून करता येईल, असं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे.