केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयासह प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभाग तसंच, राज्य शासनाचा प्रशासकीय नाविन्यता, उत्कृष्टता आणि सुशासन उपविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २७व्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद २०२४चं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या परिषदेचं ३ सप्टेंबर रोजी मुंबईत उद्घाटन होईल. या परिषदेचं यजमानपद यंदा महाराष्ट्राकडे आहे. विकसित भारत – सुरक्षित आणि शाश्वत ई सेवा पुरवठा हा या परिषदेचा विषय आहे. या परिषदेला राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.
Site Admin | August 26, 2024 8:14 PM | #national-e-governance-conference-2024 | #ख्यमंत्री एकनाथ शिंदे | #राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद