राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDAनं झारखंड विधानसभा निवडणूकीसाठी युतीतील पक्षातील जागावाटप जाहीर केलं. झारखंड निवडणूकीसाठीचे सह-प्रभारी हेमंत बिस्वा शर्मा यांनी काल झारखंडमध्ये ही माहिती दिली. भाजपा 68 जागांवर, तर ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन पक्ष 10 जागा, जमशेदपूर पश्चिम आणि तमार या दोन जागा जनता दल युनायटेडला आणि चतरा मधील एक जागा चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पक्षाला देण्यात आल्या आहेत. दरम्यान इंडी-युतीचा जागांचा तिढा अद्याप कायम आहे.
यावेळी झारखंड मुक्ती मोर्चा काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, आणि CPI बरोबर युतीत आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांच्याशी जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी राजदचे ज्येष्ठ नेते तेजस्वी प्रसाद यादव काल रांचीत दाखल झाले असून काँग्रेसचे राहुल गांधी आज जागावाटपावर चर्चा करण्यासाठी रांचीला येत आहेत. झारखंड विधानसभा निवडणूकीसीठी अधिसूचना काल जारी झाली. पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. या टप्प्यात 43 जागांसाठी 13 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात 28 नोव्हेंबरला 38 मतदारसंघांत मतदान होणार आहे. मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे.