अखिल भारतीय एससी-एसटी अर्थात, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती रेल्वे कर्मचारी संघटनेच्यावतीने नागपूरच्या अजनी रेल्वे ग्राउंड इथं उद्या २५ आणि २६ नोव्हेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि राष्ट्रीय अधिवेशनाचं आयोजन केलं आहे.
उद्या सकाळी साडे आठ वाजता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन होणार असून या संघटनेचे संरक्षक आणि केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.