जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी आज शपथ घेतली. श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. अब्दुल्ला यांच्याबरोबर आणखी ५ मंत्र्यांचाही शपथविधी यावेळी झाला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे तसंच इंडीया आघाडीतले इतर नेते या समारंभाला उपस्थित होते. संविधानाचं कलम ३७० रद्द झाल्यानंतर प्रथमच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स पक्षानं बहुमत मिळवलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ओमर अब्दुल्ला यांचं अभिनंदन केलं आहे.
Site Admin | October 16, 2024 8:32 PM | Chief Minister | Jammu and Kashmir | National Conference leader | omar abdullah
जम्मू-काश्मीरचे पहिले मुख्यमंत्री म्हणून नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे ओमर अब्दुल्ला यांचा शपथविधी
