डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

हुतात्मा क्रांतिकारक भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना देशाची आदरांजली

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातले तीन वीर क्रांतिकारक भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना संपूर्ण देश आज श्रद्धांजली वाहत आहे. १९३१ मध्ये आजच्याच दिवशी लाहोरच्या मध्यवर्ती तुरुंगात या तीन वीरांना फाशी देण्यात आली होती. या दिवसाचं शहीद दिन म्हणून स्मरण करण्यात येतं.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या तिन्ही वीरांना श्रद्धांजली वाहिली आहे. समाजमाध्यमावर मोदी यांनी भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदानाचं स्मरण केलं आहे. स्वातंत्र्य आणि न्यायासाठी या क्रांतीकारकांनी दाखवलेलं दुर्दम्य साहस आणि सर्वोच्च बलिदान देशवासियांना प्रेरित करेल, असं प्रधानमंत्री मोदी म्हणाले.

 

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज मुंबईत राजभवन इथं  क्रांतिकारक हुतात्मा भगत सिंह, राजगुरु आणि सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. राजभवनातले अधिकारी,आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद दिनानिमित्त आज सकाळी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

 

एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमावर या हुतात्मा क्रांतिकारकांना अभिवादन केलं आहे. याशिवाय नवी मुंबई महानगरपालिकेत, आणि नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठातही आज शहीद क्रांतिकारकांना आदरांजली वाहण्यात आली.  नवी दिल्लीत महाराष्ट्र परिचय केंद्रातही शहीदांना अभिवादन करण्यात आलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा