भारतीय संविधान दिन आज देशभरात सर्वत्र साजरा करण्यात आला. ७५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारत सरकारनं राज्यघटनेचा स्वीकार केला होता. त्यानिमित्त आजपासून वर्षभर विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय २०१५ ला सरकारने घेतला.
देशात सर्वत्र संविधान दिनानिमित्त पदयात्रा काढण्यात येत आहेत तसंच संविधानाच्या उद्देशिकेचं जाहीर वाचन करण्यात येत आहे. आकाशवाणी मुंबईच्या आवारात आज संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं.