नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्यावतीनं आज आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत ४२ किलोमीटर पूर्ण मॅरेथॉनचं विजेतेपद मुंबईच्या डॉ. कार्तिक जयराज करकेरा यानं पटकावलं. कार्तिकनं ही मॅरेथॉन स्पर्धा २ तास २० मिनिटांत पूर्ण केली. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातल्या सिकंदर चिंधू तडाखे यानं दुसरा क्रमांक तर वर्धा जिल्ह्यातला विक्रम भरतसिंह बंगरिया या धावपटूनं तृतीय क्रमांक पटकावला.
मॅरेथॉननंतर आयोजित समारंभात प्रथम क्रमांक विजेता डॉ. कार्तिक याला एक लाख ५१ हजार रूपये, द्वितीय क्रमांक विजेता सिकंदर चिंधू तडाखे याला एक लाख रुपये तर तृतीय क्रमांक प्राप्त विक्रम भरतसिंह बंगरिया या धावपटूला ७५ हजार रुपये देऊन सन्मानीत करण्यात आलं.
या मॅरेथॉनमध्ये राज्यातल्या विविध जिल्ह्यांतल्या धावपटूंसह उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली आदी राज्यांतले साडेतीन हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.