नाशिक शहरात बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. यामध्ये अमेरिकेतल्या दीडशे नागरिकांची सुमारे १ कोटी ९२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती नाशिक शहर सायबर पोलिसांनी दिली. हे कॉल सेंटर सुरु असलेल्या बंगल्यावर गुरुवारी रात्री पोलिसांनी छापा टाकला. इथे बारा लॅपटॉप आणि १३ मोबाईल्सच्या सहाय्याने बनावट कॉल सेंटर सुरु असल्याचं आढळून आलं. या प्रकरणी सातजणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. न्यायालयानं त्यांना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
Site Admin | February 16, 2025 3:34 PM | Financial Fraud | Nashik
नाशिक शहरात बनावट कॉल सेंटरचा छडा
