भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांना चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघात भाजपनं तिकीट नाकारल्यानं देवळा नगरपंचायतीच्या १५ नगरसेवकांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला. मागच्या आठवड्यात डॉक्टर राहुल आहेर यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचं जाहीर केलं होतं. परंतु, भाजपनं पहिल्या यादीत डॉ. राहुल आहेर यांनाच तिकीट जाहीर केल्यामुळं केदा आहेर यांचे कार्यकर्ते नाराज झाल्याचं सांगितलं जात आहे.
Site Admin | October 22, 2024 7:11 PM | Nashik
नाशिकमध्ये देवळा नगरपंचायतीत भाजपच्या १५ नगरसेवकांचा राजीनामा
