डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अंतराळ यात्री सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी नासाचं क्रू नाईन मिशन रवाना

नासा या अंतराळ संशोधन संस्थेनं आणि स्पेस एक्स या अंतराळयान निर्मिती करणाऱ्या कंपनीने काल क्रू ९ मिशन अंतर्गत अमेरिकेच्या फ्लोरिडा इथल्या केप कॅनवरल स्पेस फोर्स स्थानकावरून एक यान अंतराळात सोडलं. यात दोन अंतराळ प्रवासी तसंच दोन रिकाम्या खुर्च्या आहेत. मागच्या एक महिन्यापासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडलेले अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विलमोर यांना या यानातून परत आणलं जाणार आहे. हे अंतराळ यान आधी गुरुवारी सोडण्यात येणार होतं, पण हेलन या चक्रीवादळामुळे ते काल सोडण्यात आलं.   

 

सुनिता विल्यम्स आणु बुच विलमोर हे दोघे आठ दिवसांच्या प्रवासासाठी अंतराळात गेले होते. पण अंतराळ यानात बिघाड झाल्याने ते अंतराळ स्थानकातच अडकून पडले आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा