शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय ठरणार आहेत. ते भारतीय हवाई दलाचे अधिकारी अधिकारी असून इस्रोनं गगनयान मिशनसाठीही त्यांची निवड झाली आहे.
जूनमध्ये नासाच्या केनेडी स्पेस सेंटर इथून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणाऱ्या यानाचे ते पायलट असतील. या मोहिमेचं नेतृत्व पेगी व्हिट्सन करणार आहेत. अंतराळ स्थानकावर उतरल्यानंतर हे अंतराळवीर १४ दिवस राहतील. अंतराळ संशोधनाविषयीचा प्रचार प्रसार, त्याची व्यावसायिक उपयोगिता हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे.