डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या होकातो होतोझे सेमा याला कांस्यपदक

पॅरालिम्पिक मध्ये पुरुषांच्या गोळाफेकीत होकातो होतोझे सेमा याने कांस्य पदक जिंकल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. राष्ट्रपतींनी सेमा याच्या कामगिरीचं समाजमाध्यमाद्वारे कौतुक केलं. एका भुसुरुंग स्फोटातून बचावलेल्या सेमा यानं आपल्या पॅरालिम्पिक स्पर्धेतल्या  पदार्पणातच पदक जिंकल्याचा राष्ट्रपतींनी आवर्जून उल्लेख केला. तसंच त्याच्या उज्ज्वल भविष्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तर हा देशासाठी अभिमानास्पद क्षण असल्याचे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले. 

 

नागालँड सरकारनं सेमा यानं कांस्य पदक जिंकल्याबद्दल दीड कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. सेमा यानं पदक जिंकल्याचा राज्याला अभिमान आहे, असं नागालँडचे मुख्यमंत्री निफ्यु रियो यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.  सेमा याला अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं याची शिफारस केंद्र सरकारकडे करणार असून त्याने केलेल्या राष्ट्रसेवेबद्दल त्याची बढती करण्याची मागणीही संरक्षण मंत्रालयाकडे केली जाणार असल्याचं रियो यांनी सांगितलं. 

 

दरम्यान, पॅरीस पॅरालिम्पिकमध्ये भारतानं आतापर्यंत २७ पदकं जिंकली आहेत. यात ६ सुवर्ण, ९ रौप्य आणि १२ कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताच्या पॅरालिम्पिकच्या इतिहासातली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. आतापर्यंत उंच उडीमध्ये प्रवीण कुमार, नेमबाजीत अवनी लखेरा, भालाफेकीत सुमित अंतिल, तिरंदाज हरविंदर सिंग, बॅडमिंटनपटू नितेश कुमार आणि क्लब थ्रोवर धरमबीर नईन यांनी पदकावर आपलं नाव कोरलं आहे. सुवर्ण पदक विजेते तिरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल यांनी या एकाच पॅरालिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. या दोघी रविवारी होणाऱ्या समारोप समारोहात ध्वजवहन करणार आहेत. 

 

यानंतर होणाऱ्या सामन्यांमध्ये धावपटू सिमरन महिलांच्या दोनशे मीटर टी १२ अंतिम फेरीत, दिलिप गावित पुरुषांच्या चारशे मीटर टी ४७ अंतिम फेरीत आणि नवदीप पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी होणार आहे. 

 

पुरुषांच्या नौकानयन  स्पर्धेतल्या उपांत्य फेरीत यश कुमार शेवटच्या स्थानावर राहिला. तर पोहण्याच्या स्पर्धेत सुयश जाधव पहिल्या टॉप आठ स्पर्धकांमधून बाहेर पडला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा