नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रसिद्ध सारंगखेडा महोत्सवात अवघ्या दहा दिवसात तीन कोटी रुपयांचे व्यवहार झाले. १४ डिसेंबरपासून या महोत्सवाला सुरवात झाली. यात देशभरातल्या विविध प्रांतातून २ हजार २१० घोडे खरेदी विक्रीसाठी दाखल झाले होते. यात सहाशे ५७ घोड्यांची खरेदी विक्री झाली असून यातून ३ कोटी २ लाख ५४ हजार रुपयांची उलाढाल झाली. या बाजारात एक घोडा सुमारे ५ लाख ५१ हजार रुपये किंमतीला विकला गेल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, पुढचे ६ दिवस हा महोत्सव सुरु राहील, अशी माहीती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
Site Admin | December 24, 2024 3:17 PM | Nandurbar | Sarangkheda Festival